नमस्कार पालक हो,
तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होत आहे की गुडीपाडव्याचे औचित्य साधुन शनिवार, दिनांक ६ एप्रिल २०१९ रोजी “माय मराठी” (Culture Beyond Borders) या उपक्रमाचे उदघाटन आयोजित केले आहे.
विशेष म्हणजे, मंडळाने भारती विद्यापीठ, पुणे यांच्या सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार भारती विद्यापीठ आपल्या “माय मराठी” या उपक्रमातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, पुस्तके आणि परीक्षा प्रमाणपत्रे देणार आहे.
“माय मराठी” या उपक्रमाचे धोरण असे आहे:
१. मराठी लिहिणे, वाचणे व बोलणे शिकवले जाईल.
२. मराठी संस्कृती, इतिहास, सण आणि उत्सव यांची माहिती करून देणे ह्यावरही भर असेल.
३. गोष्टी, गाणी, खेळ आणि मुलांना आवडतील असे प्रकल्प अशा माध्यमांमधून मुलांना मराठी शिकवले जाईल.
४. नाव नोंदणी केलेल्या पाल्यांच वय आणि मराठी विषयाच्या ज्ञाना नुसार वर्ग विभागणी केली जाऊ शकते.
माय मराठी उपक्रम जरी एप्रिल मधे सुरु होत असला तरी प्रवेश ८ मार्च २०१९ पर्यंत घेणे आवश्यक आहें.
प्रवेश घेतला की पूर्ण फी लागू होईल.
प्रवेशासाठी खालील लिंकवर अर्ज़ भरावा.
https://form.jotformeu.com/mmmschool/enrollment-form
वेळ: सकाळी १० ते १२ (महिन्याचा पहिला आणि तिसरा रविवार*)
वयोगट: ४ ते १४ वर्ष
स्थळ:
Stadtteilkulturzentrum, Guardinistr 90, 81375, Munich
(*वेळ आणि ठिकाण बदलणे बाबतचे अंतिम अधिकार मंडळाचे राहतील.)
प्रवेश शुल्क प्रत्येकी (पुस्तके व परीक्षा फी धरून) : ४५ € वार्षिक (१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०)
Note: वर्ग संख्या मर्यादित असल्यामुळे प्रथम प्रवेश घेतलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क करा marathischule@gmail.com
आर्थिक सहकार्याबद्दल विशेष आभार:
Consulate General of India (Munich)
GloreSoft GmbH (Mr. Prasad Chaudhari)
सस्नेह,
आपली ममम कार्यकारिणी
Catch on Facebook